राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा या मागणीसाठी अमरावतीत गुरुदेव भक्तांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक आंदोलन केलं आहे. येत्या २६ जानेवारीला जाहीर होणाऱ्या भारतरत्न पुरस्काराच्या यादीत राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं नाव असावं अशी मागणी आंदोलकांनी केली आहे.