महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मंदिरात धाराशिव जिल्ह्यातील प्रसिद्ध कुंथनगिरी पेढ्याला प्रसाद म्हणून मान्यता द्यावी, अशी मागणी खवा व पेढा उत्पादकांनी केली आहे. सध्या मंदिरात लाडू प्रसादाची विक्री होत असून, त्याचप्रमाणे जीआय मानांकन प्राप्त कुंथनगिरी पेढाही उपलब्ध करून द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे.