नाशिकच्या सप्तशृंगी गडावर प्रशासनाने अतिवृष्टीमुळे भाविकांना दर्शनास जाण्यास बंदी घातली आहे. सध्या गडावर पाऊस सुरू असून घाटातून जाताना अनेक ठिकाणी धबधबे कोसळत आहेत. तर गडावर सर्वत्र धुक्याची चादर पसरली आहे. रस्त्यातून वाट काढताना गडावरील स्थानिकांना धुक्यामुळे अडचणी येत आहेत.