नाशिकच्या देवळाली येथील मतदान केंद्रावर गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. एका शासकीय कर्मचाऱ्यावर पैसे वाटप करत असल्याचा आरोप झाल्यानंतर शिंदेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी त्याला चोप दिला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करत संबंधित व्यक्तीला ताब्यात घेतले. या प्रकारामुळे निवडणुकीतील गैरप्रकारांवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.