विदर्भाचे पंढरीनाथ मानल्या जाणाऱ्या शेगावच्या संत गजानन महाराजांच्या पालखीने काल शेगावातून पंढरपूरकडे प्रस्थान केलं. यंदा या पालखीचं 57वं वर्ष असून पालखीने बुलढाणा जिल्हा पार करत अकोला जिल्ह्यात प्रवेश केला आहे.