शेगाव येथून श्री संत गजाननाच्या पंढरीतून श्री विठ्ठलाच्या पंढरीसाठी शेगावातुन 700 वारकऱ्यांच्या वर आज 21 जून ब्रह्म मुहूर्तावर सकाळी सात वाजता श्रींच्या पालखीचे श्री क्षेत्र पंढरपूरकडे श्रींच्या मंदिर परिसरातुन प्रस्थान झाले. श्री शेत्र पंढरपूर येथे आषाढी एकादशी महोत्सवात सहभागी होण्याची हे श्रींच्या पालखीचे 57 वर्ष आहे श्रींच्या पालखी समवेत700च्या वर वारकऱ्यासह आश्वासह, टाळकरी, वारकरी ,पताकाधारी श्रीहरी नामाच्या व टाळ मृदंगाच्या गजरात जय हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठल, जय गजानन श्री गजानन, गण गण गणात बोते ,या मंत्राचा नाम जप करत वारकरी संत नगरीतून श्री विठ्ठलाच्या पंढरीकडे व प्रस्थान केले