नंदुरबार शहराला जोडणाऱ्या महामार्गांसह शहरातील अंतर्गत रस्त्यांचीही अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. रस्त्यांवर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनधारकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. शहरातील जगतापवाडी चौफुली परिसरात तर मोठ्या खड्ड्यांमुळे वाहनधारकांना रस्त्याचा अंदाज येत नसल्याने दिवसेंदिवस अपघातांच्या घटना घडत आहेत.