दिवंगत अजित पवार यांच्या निधनामुळे बारामती विधानसभा मतदारसंघाची जागा रिक्त झाली होती. त्यामुळे या मतदारसंघात पोटनिवडणूक घेतली जात आहे. दरम्यान, बारामतीमध्ये मतदानानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. आज बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या निमित्ताने या देशाची एक जबाबदार नागरिक म्हणून काटेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत मतदानाचा हक्क बजावला. लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी आपला मतदानाचा मूलभूत हक्क बजावावा. असं देखील सुनेत्रा पवार म्हणाल्या.