सातपुड्यात मुसळधार पाऊस पडला. त्यामुळे पाल येथील सुकी नदी खळखळून वाहू लागली. रावेर तालुक्यातील सुकी नदीवरील गारबर्डी धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. यामुळे रावेर तालुक्यात पाणीटंचाईचा प्रश्न मिटला असून शेतकऱ्यांच्या सिंचनाचाही पाण्याचा प्रश्न मिटला आहे शेतकऱ्यांचा सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे