छत्रपती संभाजीनगरमधील पैठण तालुक्यातील वरुडी गावातील कांदा उत्पादक शेतकरी प्रकाश गलधर यांची धक्कादायक व्यथा समोर आली आहे. तीन महिने मेहनत करून पिकवलेला 1262 किलो कांदा बाजारात विकल्यानंतर त्यांना पैसे मिळण्याऐवजी उलट अडत्याला 1 रुपया द्यावा लागला.