महाराष्ट्रामध्ये सजावटीसाठी वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिक फुलांवर बंदी घालण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही घोषणा केली असून, अशा फुलांचा वापर करणाऱ्या डेकोरेटर्स आणि मंगल कार्यालयांवर कायदेशीर कारवाई तसेच दंड आकारला जाईल. पर्यावरण संरक्षणासाठी नैसर्गिक फुलांच्या वापराला प्रोत्साहन दिले जाणार आहे. या संदर्भात लवकरच शासन निर्णय आणि नियमावली जारी केली जाईल.