मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे बंधूंवर निशाणा साधत महाराष्ट्रात बाळासाहेब ठाकरे हेच एकमेव ब्रँड असल्याचे म्हटले आहे. हिंदू हृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हेच महाराष्ट्रातील एकमेव ब्रँड होते. आता कोणीही स्वतःला ब्रँड समजू नये. आमच्या महायुतीसमोर कोणीही उभे राहिल्यास त्यांचा बँड वाजवू, असा इशारा त्यांनी दिला.