देवेंद्र फडणवीस यांनी मराठी माणसाच्या अस्तित्वाची शेवटची लढाई या आशयाच्या पोस्टरला प्रत्युत्तर दिले आहे. त्यांनी म्हटले आहे की हे पोस्टर्स ठाकरे बंधूंचे स्वतःचे अस्तित्व वाचवण्यासाठी आहेत, मराठी माणसाचे नव्हे. फडणवीस यांनी ठाकरेंच्या 25 वर्षांच्या राजवटीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, त्यांनी मराठी माणसासाठी काय केले असा सवाल केला आहे.