देवेंद्र फडणवीस यांनी डिजिटल अरेस्ट ही कायदेशीर प्रक्रिया नसल्याचे स्पष्ट केले आहे. कायद्यात कोणालाही डिजिटल पद्धतीने अटक करता येत नाही. असा फोन किंवा व्हिडिओ कॉल आल्यास ती फसवणूक समजावी आणि तात्काळ 1930 या हेल्पलाइनवर संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केले. यामुळे गोल्डन अवरमध्ये पैशांचे संभाव्य हस्तांतरण रोखता येते, कारण बँका आणि NBFCs या प्लॅटफॉर्मवर जोडलेल्या आहेत.