देवेंद्र फडणवीस यांनी मातोश्रीबाबत उद्धव ठाकरेंच्या विधानाला प्रत्युत्तर दिले. फडणवीस म्हणाले की, मातोश्रीची दारं त्यांच्यासाठी बंद होती, पण आता त्यांना महाराष्ट्रातील जनतेचा पाठिंबा मिळाला आहे. त्यामुळे इतर दारांची त्यांना लालसा नाही. मात्र, चहासाठी कोणी बोलावलं तर ते नकार देत नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले.