देवेंद्र फडणवीस यांनी शिवरायांनी सुरत लुटल्याच्या विधानावर तीव्र आक्षेप घेतला आहे. त्यांनी स्पष्ट केले की, शिवाजी महाराजांनी सुरत लुटली नसून, औरंगजेबाच्या सैन्याने स्वराज्यातून लुटलेला खजिना परत आणण्यासाठी स्वारी केली होती. शिवराय लुटारू नव्हते, असेही त्यांनी नमूद केले.