मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आजपासून तीन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. नाशिक आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये ते महत्त्वाच्या आढावा बैठका घेणार आहेत. या बैठकांमध्ये भाजपचे आमदार, खासदार, जिल्हाध्यक्ष तसेच महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांसंदर्भात सखोल आढावा घेतला जाईल. प्रमुख अपेक्षित नेते आणि पदाधिकारी यांनाच बैठकांना प्रवेश दिला जाणार आहे.