देवेंद्र फडणवीस यांनी एमआयएमसोबत कोणतीही युती करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. तात्काळ स्थानिक आघाड्या तोडल्या असून, एमआयएमशी युती केलेल्या आमदारांना पक्षातून निलंबित करण्याबाबत नोटिसा बजावल्या आहेत. एमआयएमसोबत युती करणे आपल्या तत्त्वात बसत नसल्याने, विरोधी पक्षात बसणे पसंत करू, असे फडणवीस म्हणाले.