उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली आहे. वोटचोरी आणि ईव्हीएमसारखे मुद्दे पुरावा नसताना सातत्याने मांडणाऱ्या विरोधकांना आता जमिनीवर यावे लागले आहे, असे ते म्हणाले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीत याच प्रकारची स्थिती कायम राहिल्यास विरोधकांना पराभवाला सामोरे जावे लागेल, असे भाकीत फडणवीस यांनी केले.