देवेंद्र फडणवीस यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या सुपुत्रांकडून मतांसाठी लांगुलचालन सुरू असल्याचा आरोप केला आहे. विशिष्ट लोकांचे जोडे चाटून त्यांना दीर्घकाळ फायदा होणार नाही, असा इशारा फडणवीस यांनी दिला. बीएमसी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे विधान महत्त्वाचे असून, याचे दुष्परिणाम संबंधित गटाला भोगावे लागतील, असेही ते म्हणाले.