देवगड हापूस आंब्याचं पिक धोक्यात असून शेतकरी हवालदिल झाला आहे. यंदा म्हणावं तसं आंबा उत्पादन न झाल्याने बागायतदरामध्ये निराशेचं वातावरण आहे. 90 ते 95 टक्के आंब्यांचं नुकसान झालं आहे. तर 5 टक्के आंबाच झाडावर शिल्लक आहे. आंबा उत्पादकांकडून नुकसान भरपाईची मागणी केली जात आहे.