पालघर जिल्ह्यात 6 जुलै रोजी झालेल्या महापुरात केळवे रोड पूर्वेच्या देवीपाडा,मायखोप ग्राम पंचायत हद्दीतील तरडे पाडा, देव शेत, झांजरोळी, मंडळ पाडा या गावाना महापुराचा वेढा पडल्याने येथील नागरिकांना जीव वाचवण्यासाठी घराच्या छतावर रात्र काढावी लागली. येथील देवीपाडा गावातील दिनेश काशिनाथ बाबर यांच्या घराला पुराच्या पाण्याचा वेढा पडला होता, बाहेर पडायला रस्ता नव्हता त्यामुळे त्यांनी आपल्या कुटुंबाला घराची खिडकी तोडून थेट छपरावर नेलं आणि कुटुंब वाचवलं.