साईबाबांच्या चरणी सोन्याचा दानाचा ओघ सुरूच आहे..साईबाबांवर देश-विदेशातील लाखो भाविकांची अढळ श्रद्धा असून भाविक भक्तिभावाने साईबाबांच्या चरणी विविध प्रकारचे दान अर्पण करत असतात... आज उत्तर प्रदेशातील लखनौ येथील साईभक्त गोविंद गोयल यांनी साईबाबांच्या चरणी तब्बल 780 ग्रॅम वजनाचा आकर्षक नक्षीकाम असलेला सुवर्ण मुकुट अर्पण केलाय. या सुवर्ण मुकुटाची किंमत सुमारे 92 लाख रुपये आहे.. यावेळी साईबाबा संस्थानच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी साईभक्त गोविंद गोयल यांचा सत्कार केलाय..