अंगारकी संकष्टी चतुर्थीनिमित्त अष्टविनायक क्षेत्र ओझरच्या विघ्नहर मंदिरात भाविकांचा मोठा उत्साह पाहायला मिळतोय. अंगारकीच्या मुहूर्तावर विघ्नहराचा संपूर्ण गाभारा विविधरंगी फुलांनी अत्यंत आकर्षकरीत्या सजवण्यात आला आहे.