कोकण वासियांची कुलदैवता असलेल्या अंबाजोगाईतील योगेश्वरी देवीच्या मंदिरासाठी मुंबईतील एका भक्ताने तब्बल एक कोटी रुपयांची देणगी दिली आहे.मंदिराच्या शंभर वर्ष जुन्या शिखराच्या जीर्णोद्धारासाठी ही देणगी भक्ताकडून गुप्त पद्धतीने देण्यात आलीय. योगेश्वरी मंदिराचे शिखर हे चुन्याच्या बांधकामात असल्याने ते काहीसे कमकुवत झाले होते. या ऐतिहासिक शिखराचा जिर्णोद्धार करण्याचा निर्णय नुकताच योगेश्वरी देवस्थान समितीकडून घेण्यात आला होता या कामासाठी साधारण 80 ते 90 लाख रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याची माहिती मुंबईतील एका भक्ताला मिळाली. त्यानंतर तातडीने एक कोटी रुपयांचा धनादेश योगेश्वरी देवस्थान समितीच्या विश्वस्थानकडे सुपूर्द केला होता ती रक्कम आता देवस्थान समितीच्या खात्यात जमा झाली असून या शिखराचा जिर्णोद्धार तामिळनाडू येथील कुशल कारागीर करणार आहेत.