माघी यात्रेच्या निमित्ताने आज औसा येथील औसेकर महाराज फडाचे चक्री भजन श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात शेकडो भाविकांच्या उपस्थित पार पडले.श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात चक्री भजन सादर करण्याची औसेकर महाराज फडाची शेकडो वर्षाची मोठी परंपरा आहे. दरवर्षी माघी यात्रेच्या निमित्ताने माघ शुध्द त्रयोदशीच्या दिवशी विठ्ठल रुक्मिणी मंदिरात हजारो भाविकांच्या उपस्थितीत चक्री भजन सादर करून विठ्ठलाला प्रसन्न करण्याची ही परंपरा औसेकर महाराज फडाकडे आहे.