आषाढी एकादशीच्या निमित्त संपूर्ण राज्यभरात विठ्ठल भक्तीचा उत्साह ओसंडून वाहत असताना, महाबळेश्वर तालुक्यातील कोयना भागातील निपाणी ग्रामस्थांनी विठू माऊलीच्या चरणी एक अनोखी प्रार्थना केली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा राज्याच्या नेतृत्वाची धुरा सांभाळावी, म्हणजेच ते पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत, असे साकडे त्यांच्या मूळ दरे गाव परिसरातील भाविकांनी विठ्ठलाला घातले. परिसरातील मंदिरांमध्ये टाळ-मृदंगाचा गजर आणि हरिनामाच्या घोषात ग्रामस्थांनी आपल्या या सुपुत्रासाठी हा भक्तिमय संकल्प सोडला आहे, यावेळी निपाणी गावातून ग्रामस्थांनी भव्यदिंडी काढून आषाढी एकादशी साजरी केली. या दिंडीमध्ये मोठ्या संख्येने भाविक सहभागी झालेले पाहायला मिळाले