अमरावती जिल्ह्यातील संत ब्रह्मचारी महाराजांच्या १४९ वा पुण्यतिथी महोत्सवनिमित्त रेवसा इथं भाविकांचा जनसागर उसळला. रेवसा इथल्या संत ब्रह्मचारी महाराजांच्या समाधीस्थळी प्रांगणात भजन, कीर्तन, होमहवन, रथयात्रा, ढोल-ताशा पथक, झाकी स्पर्धा, विदर्भ स्तरीय खंजेरी भजन स्पर्धा, रक्तदान शिबिर, आरोग्य तपासणी शिबिर, व्यायामाचे प्रात्यक्षिके, गोपाळकाला अशा विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं.