देशभरातील लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेलं संत गजानन महाराजांच्या शेगाव इथं देशभरातून येणाऱ्या भाविकांच्या आरोग्याशी खेळ केला जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. मंदिर परिसरात चक्क उघड्यावर खाद्यपदार्थ विकले जात आहेत आणि हजारो भाविक ते विकत घेऊन खात असल्याने त्यावर कुणाचंही नियंत्रण नसल्याचं समोर आलं आहे.