सरत्या वर्षाला निरोप देत नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी देशभरातून तसेच परदेशातून मोठ्या प्रमाणात भाविक शिर्डीत दाखल होतायत.. मंदिर परिसर साईनामाच्या जयघोषाने दुमदूमून गेलीय... मागील सात दिवसांपासूनच गर्दीचा ओघ सुरू असून आज गर्दीत वाढ होताना दिसत आहे. साई मंदिर आज भाविकांसाठी रात्रभर खुले ठेवण्यात आले असून भाविकांना अखंड दर्शनाचा लाभ घेता येणार आहे.