येवल्याच्या पैठणीला आता स्वामी समर्थांच्या प्रतिमेमुळे एक अनोखा आध्यात्मिक स्पर्श लाभला आहे. 'देऊळ बंद 2' चित्रपटातून प्रेरणा घेत, दुबईतील स्वामीभक्त कौस्तुभ कमलापुरकर यांनी येवल्याचे कारागीर चेतन धसे यांच्याकडून ही खास पैठणी बनवून घेतली.