जळगावात कृषी उत्पन्न बाजार समिती ते अजिंठा चौकापर्यंत भव्य धम्म रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. रॅलीत सहभागी थायलंडसह देशभरातील १२० भिक्खुनींच्या स्वागतासाठी चक्क ५५० फूट लांब फुलांचा गालिचा अंथरला होता. दीड किलोमीटरच्या भव्य मिरवणुकीत एकूण ५५० किलो फुलांची उधळण करण्यात आली. धम्म रॅलीत बुद्धं शरणं गच्छामीच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. रॅलीच्या मार्गात भिक्खुनींच्या शिस्तबद्ध चालण्याने आणि फुलांच्या त्या लांबच लांब गालिच्याने धम्म रॅलीने लक्ष वेधले.