गणपती बाप्पांचे आगमनाकरिता अजून काही दिवस शिल्लक आहेत. मात्र, नागपंचमीच्या दिवशी सर्वत्र नागाचे पूजन होत असताना, अमरावतीच्या भातकुली तालुक्यातील धामोरी या गावात दीड दिवसांच्या गणपती बाप्पांचे आगमन झाले. २०० वर्षांहून अधिक कालावधीच्या या पारंपरिक उत्सवात गावकरी मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.पूजेचा पहिला मान अमोल वारघडे परिवाराला मिळाला.