गेल्या काही दिवसात धनंजय मुंडे हे विविध वक्तव्यामुळे चर्चेत असतात. एका कार्यक्रमात उपस्थितांना आरोग्याचे धडे देत असताना मी स्वतः जिम करतो, बऱ्यापैकी मी स्वतः माझं वजन कमी केलंय. सर्वच क्षेत्रातलं आपलं वजन कमी झालं होतं, पण येणारा काळ आपलाय. येत्या काळात चांगलं फिट राहिला पाहिजे. त्यामुळं मी आता जिम करतोय. मागच्या एक दीड वर्षांमध्ये जिवलग सहकारी सुद्धा भेटल्यावर सुद्धा एकच प्रश्न विचारत होते, भाऊ तब्येत कशी आहे. ते ऐकून मी परेशान झालो मी म्हटलं आता चमत्कार दाखवावा लागेल. आता जिम करतोय. कामाच्या व्यापामध्ये कमी जास्त होतंय, असेही धनंजय मुंडे यावेळी म्हणाले.