माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी आज श्री क्षेत्र भगवानगड येथे संत भगवानबाबा तसेच संत भीमसिंह महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेतले. त्याचबरोबर गडाचे महंत ह.भ.प. न्यायाचार्य डॉ. नामदेव महाराज शास्त्री यांचे दर्शन घेतले.यावेळी महंत नामदेव शास्त्री आणि धनंजय मुंडे यांनी एकत्रित गडावर सुरू असलेल्या संत ज्ञानेश्वर माऊलींच्या भव्य मंदिर उभारणी, तसेच विद्यार्थी भवन आणि अन्य विकासकामांची पाहणी केली.