सोलापुरात माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त समर्थकाकडून 51 किलो लाडूची तुला करण्यात आली. एका काट्यात धनंजय मुंडे यांची प्रतिमा तर दुसऱ्या बाजूला 51 किलोचा भव्य असा लाडू ठेवत तुला करण्यात आली. सोलापूरचे ग्रामदैवत शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराज मंदिरात ही लाडूतुला करण्यात आली.