धाराशिवमध्ये अज्ञातांकडून तीन एसटी बसेसची तोडफोड करण्यात आली आहे. तोंडाला रुमाल बांधून दुचाकीवर आलेल्या हल्लेखोरांनी स्थानकात उभ्या असलेल्या बसेसना लक्ष्य केले. सीसीटीव्हीत हा प्रकार कैद झाला असून, बसेसवर 'EVM हटाव, लोकतंत्र वाचवा' अशी पोस्टर्स चिकटवली आहेत. कळंब तालुक्यातील तांदुळवाडी येथे सुरू असलेल्या EVM विरोधी आंदोलनाशी या तोडफोडीचा संबंध जोडला जात आहे.