सोमवारी राज्यातील १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांच्या निवडणूकांचे निकाल लागले. सकाळी मतमोजणीची जशी प्रक्रिया सुरू झाली तसे कार्यकर्ताचा उत्साह शिगेला पोहचला. परांडा मतमोजणी केंद्राच्या जवळ कार्यकर्त्यांनी गुलाल उधळत जल्लोष करायला सुरुवात केली.