धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यामध्ये रेशीम उद्योग शेतकऱ्यांना अवकाळीचा फटका बसला आहे. अतिवृष्टी झालेल्या भूम परंडा तालुक्यात पारंपरिक उत्पादन सोडून शेतकरी रेशीम उद्योगाकडे वळाला आहे. मात्र जिल्ह्यात चार दिवस पडलेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे या उत्पादनालाही त्याचा फटका बसला आहे. नुकसान झालेल्या रेशीम उद्योगाचे पंचनामे करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.