धाराशिवमध्ये लाडक्या लेकीला लग्नाच्या हळदीला पाठवणीसाठी हेलिकॉप्टर मागवत थाटामाटात मुलीला सासरी पाठवले. परंडा तालुक्यातील सोनगिरी येथील शेतकरी, उद्योजक अशोक (बापू) वेताळ यांची एकुलती एक कन्या ऋतुजा हिचा विवाह माढा (जि. सोलापूर) तालुक्यातील सापटणे येथील उद्योजक विठ्ठल माणिकराव ढवळे-पाटील यांच्या मुलाशी ठरला आहे.