धाराशिव -अतिवृष्टीत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारने दिलेले 31 हजार कोटीचे पॅकेज फसवे असल्याने त्याच्या निषेधार्थ धाराशिव जिल्ह्यातील वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शेतकऱ्यांनी केळी वाटप करून उपहासात्मक आंदोलन केले.मदतीत अनेक जाचक अटी असल्याने ती मिळणे शक्य नाही.त्यामुळे दुधी, मुळे आणि भोपळ्यावर सरकारचे नाव लिहून निषेध नोंदवला गेला.