धनगर समाजातील आंदोलनकर्ते दीपक बोराडे यांना पोलिसांनी अटक केल्यानंतर धाराशिव जिल्ह्यात तणावाचं वातावरण निर्माण झाले होते. दीपक बोराडे यांच्या अटकेच्या निषेधार्थ धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांनी औसा–तुळजापूर रोडवर खंडाळा गावच्या पाटीवर टायर पेटवून आंदोलन सुरू केलं आहे.या आंदोलनामुळे या मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.