व्यावसायिक सिलिंडर बंद असल्याने श्री तुळजाभवानीच्या तुळजापूरात शहरातील हॉटेल व्यवसाय अडचणीत सापडला आहे. सिलिंडर नसल्यामुळे अनेक हॉटेल चालकांना नाश्ता आणि जेवणाचे पदार्थ चुलीवर घरी तयार करून हॉटेलमध्ये आणावे लागत आहेत.या परिस्थितीमुळे तुळजापूरमधील अनेक हॉटेल्स बंद होण्याच्या मार्गावर असून भाविकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून श्री तुळजाभवानीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना हॉटेलमध्ये जे उपलब्ध असेल तेच खावे लागत आहे.