श्री तुळजाभवानी मंदिर येथे रविवारची सुट्टी आणि सुरू असलेल्या अधिक मासाच्या पार्श्वभूमीवर भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. राज्यासह परराज्यातूनही हजारो भाविक तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी तुळजापूरमध्ये दाखल झाले आहेत. मंदिर परिसर, महाद्वार रोड, दर्शन रांगा भाविकांनी फुलून गेल्या आहेत.