धाराशिव- उमरगा पंचायत समितीचे निवडून आलेले सदस्य भाजपाने सहलीवर पाठवले आहेत. माजी मंत्री आणि भाजपाचे नेते बसवराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपाचे 7 पंचायत समिती सदस्य मुंबईच्या सहलीवर गेले आहेत.फोडा फोडीच्या राजकारणामुळे निवडून आलेले सदस्य सहलीवर पाठवून भाजपाने सावध भूमिका घेतली आहे.