तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध प्रशासन (FDA) आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर राज्यभर भेसळयुक्त अन्नपदार्थांवर सुरू झालेल्या धडक कारवायांचा सकारात्मक परिणाम धाराशिवच्या खवा आणि पेढा उद्योगावर दिसून येत आहे. वर्षाकाठी सुमारे 5 हजार कोटींची उलाढाल असलेल्या धाराशिवच्या भूम आणि वाशी परिसरात दररोज 60 ते 70 टन खव्याचे उत्पादन केले जाते.