प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेतील कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी धाराशिवमध्ये मोर्चा काढण्यात आला.सध्या केवळ २,५०० रुपये मासिक मानधन मिळत असल्याचा संघटनेचा दावा आहे. केरळच्या धर्तीवर १८ हजार रुपये मासिक मानधन देण्याची प्रमुख मागणी करण्यात आली आहे.