महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेची शाकंभरी नवरात्र महोत्सवपूर्वीची मंचकी निद्रा संपवुन देवी आज पहाटे सिंहासनावर विराजमान झाली आहे तर दुपारी महोत्सवाचे यजमान उल्हास कागदे यांच्या हस्ते गणेश विहारात सपत्नीक विधीवत घटस्थापना करण्यात आली. पुढील सात दिवस मंदीरात विविध धार्मिक कार्यक्रम व देवीच्या अलंकार महापूजा तर या कालावधीत दररोज छबिना मिरवणूक काढण्यात येणार आहे.3 जानेवारी रोजी शांकभरी पोर्णिमेला पुर्णाहुती आणि त्यानंतर घटोत्थापनाने या नवरात्र महोत्सवाची सांगता होणार आहे.एकीकडे शाकंभरी नवरात्र महोत्सव आणि सलग सुट्यांमुळे तुळजापूरात भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.