इराण,अमेरिका युद्धाचे धाराशिवमधील शिवभोजन केंद्रावर पडसाद जाणवत आहेत. व्यावसायिक सिलेंडर बंद केल्याने शिवभोजन थाळी चालक अडचणीत सापडले आहेत. आता चुलीवर स्वयंपाक करून शिवभोजन केंद्रे चालवली जात आहेत. कमीत कमी शिवभोजन चालकाला तरी राज्य सरकारने व्यावसायिक सिलेंडर द्यावेत अशी चालकांनी मागणी केली आहे.