धाराशिव जिल्ह्यातील तेर येथील सुनेत्रा पवार यांच्या नातेवाईकांनी त्यांच्या उपमुख्यमंत्री पदाच्या शपथविधीविषयी भावना व्यक्त केल्या. सुनेत्रा पवार यांच्या उपमुख्यमंत्री पदाबाबत त्यांच्या नातेवाईकांनी बालपणीच्या आठवणी जागवल्या. सुनेत्रा पवार ह्या अगदी धाडसाने उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी सांभाळतील असा आत्मविश्वास तेरमधील गावकऱ्यांनी व्यक्त केला. एकीकडे अजित पवार गेल्याचे दु:ख तर दुसरीकडे आमची लेक उपमुख्यमंत्री होणार याचाही आनंद आहे अशा भावना गावातील ग्रामस्थांनी व्यक्त केल्या.